योग वधू-वर केंद्रात आपले स्वागत आहे

योग वधू वर सूचक केंद्राविषयी

योग वधू वर सूचक केंद्राविषयी


योग वधू वर सूचक केंद्र या महाराष्ट्रातील नामांकित विवाहसंस्थेचे संस्थापक , श्री गिरीश बाळासाहेब पाटील (BE,MBA) यांनी मे २०१३ मध्ये समाजातील वधुवरांसाठी या विवाह संस्थेची स्थापना पुणे येथे केली.

समाजातील मुलामुलींची लग्ने जमविण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करून सदर विवाह संस्थेची स्थापना केली. शिक्षणामुळे नोकरी व्यवसायानिमित्त मूळ गावाकडील भाऊबंद / नातलग यांच्याशी असलेला संपर्क कमी झाल्याने, मुला-मुलींचे शिक्षण वाढल्याने मुलामुलीच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा देखील उंचावल्या.

समाजात लग्न जमविताना काही अनिष्ट प्रथा चालीरीती रूढ होऊ लागल्या. त्या संदर्भात अशा पालकांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून देऊन समाज प्रबोधनाचे मोठे काम आमच्या संस्थेने केले. उदा. जन्मकुंडलीचा आग्रह धरणे, मुलामुलीची नाडी एक असणे, नुसत्या कुळावरून मामा भाची नाते मानणे. यासारख्या अंधाश्रद्धांपायी पालक आपल्या मुला-मुलींसाठी हातचे चांगले स्थळ सोडून देतात आणि स्वतःच्या पाल्याच्या विवाहात अडथळा निर्माण करतात. या सर्व गोष्टींची जाणीव संस्थेने या केंद्राच्या माध्यमातून समाजातील पालकांना वेळोवेळी करून दिली. योग वधू वर सूचक केंद्राचे वतीने प्रत्येक वर्षी दर ३ महिन्यातून एकदा मुला/मुलींचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. केंद्राचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून केंद्राची स्वतंत्र वेब साईट http://www.yogvadhuvar.com या नावाने सुरु करण्यात आली असून त्याद्वारे सभासदांना अनुरूप माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे.

वधू-वरांचे - वजन, उंची, रंग, शिक्षण, स्वभाव, वयातील अंतर, जात, आर्थिक परिस्थिती, नोकरी कि व्यवसाय, सध्या राहण्याचे ठिकाण काय असेल, कुंडली या सर्व गोष्टींचा आढावा घेणारे एकमेव व्यासपीठ. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण, मराठा, सुतार, माळी, कुंभार, लिंगायत, लोहार, नाभिक, चर्मकार, धनगर, गुरव, कोष्टी, वडार, महार, इत्यादी समाजातील स्थळांची मोफत नोंदणी होते. केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांतील, शहरातील समाजातील प्रत्येक जातीतील स्वजातीय, आंतरजातीय, अल्पशिक्षित, उच्चशिक्षित, ग्रामीण व शहरी भागातील प्रथम, घटस्फोटीत, विधुर, विधवा अशा पुनर्विवाहाची, प्रौढ , ज्येष्ठ नागरिक इत्यादी स्थळांची नोंदणी होते.

आमच्या संस्थेस समाजातील सर्व पालकांचे प्रेम/विश्वास आत्तापर्यंत जसा मिळाला तसाच पुढे मिळत राहो. केंद्राच्या या सुविधांमुळे व माध्यमातून पालकांना आपल्या पाल्यासाठी विवाह जमविल्यास फार मोठा आधार मिळाल्याने अल्पावधीतच सदर केंद्राचा नावलौकिक महाराष्ट्रात आजमितीस असून त्यासाठी श्री गिरीश बाळासाहेब पाटील यांचे फार मोठे योगदान आहे.

योग वधू वर सूचक केंद्र, पुणे या विवाह संस्थेच्या कामकाजाविषयी समाजबांधवांच्या काही सूचना अभिप्राय असल्यास त्या संस्थेला अवश्य कळवाव्यात. आपल्या विधायक सूचनांचा निश्चितच समावेश मंडळाच्या कामकाजांत करण्यात येईल.

- योग वधू वर सूचक केंद्र

संचालक : श्री. गिरीश पाटील, BE, MBA

मोफत नोंदणी

महाराष्ट्रात कोठूनही आपले नाव नोंदवा

व्हॉट्स-ॲप सपोर्ट

व्हाट्स ॲप वर माहिती मिळण्याची सोय

माफक फी

गुगल/फोन पे, ऑनलाईन बँकिंग - सुरक्षित पेमेंटची सोय